Showing posts with label Sparrow. Show all posts
Showing posts with label Sparrow. Show all posts

Monday, 5 September 2016

चिऊ ताई


चिऊ

होते मी आसपास , छोटेसे माझे खोपटे 

होते तुमच्या घरात , पुरे मला परसातील रोपटे

पाडले वाडे ,गेले बुजून सांदी कोपरे 

उभे राहीले सिमेंट चे मनोरे

लागले देशोधडीला गेले उडून दूर

गोष्टीतच राहिले थोडीफार ऊरून

आहेत तुमच्या शहरात माझे भाऊ

काऊ दिसताच आठवते बिचारी  चिऊ

सुनील

३० .०८.१६